AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
आता मोबाईलद्वारे करा ओळखपत्र लिंक!
समाचारAgrostar
आता मोबाईलद्वारे करा ओळखपत्र लिंक!
👉🏻मतदान (कार्ड) ओळखपत्र आणि आधार कार्ड लिंक कसे करायचे? 👉🏻सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये मतदान ओळखपत्र आणि आधार नंबर लिंक करण्यासाठी प्ले स्टोर मधून Voter Helpline ॲप घ्यावे लागेल. 👉🏻हे app तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल केल्यानंतर सर्वप्रथम Voter Registration वरील बटन दाबावे लागेल. नंतर फॉर्म 6 b बटन दाबावे. 👉🏻त्यानंतर Lets Strat या बटनावर क्लिक करावे लागेल. 👉🏻त्यानंतर आपला मोबाईल नंबर त्यामध्ये भरावा लागेल आणि ओटीपी टाकावा लागेल. 👉🏻ओटीपी भरून झाल्यानंतर Verify या बटनावर क्लिक करावे लागेल. 👉🏻त्यानंतर पुढचे पेज ओपन होईल त्यानंतर Next बटन दाबावे. 👉🏻आपला मतदान ओळखपत्र क्रमांक टाका आणि नंतर Maharashtra हे राज्य Place मध्ये निवडावे आणि Fetch या बटनावर क्लिक करावे. 👉🏻त्यानंतर Proceed हे बटन दाबावे. 👉🏻आपलं मतदान ओळखपत्र क्रमांक माहिती आणि आधार डिटेल्स मध्ये आपला बारा अंकी आधार क्रमांक भरावा लागेल. 👉🏻आपला मतदान ओळखपत्र क्रमांक माहिती दिसेल आणि आधार डिटेल्स मध्ये आपला 12 अंकी क्रमांक आधार क्रमांक टाकावा लागेल. 👉🏻त्यानंतर मोबाईल नंबर भरावा लागेल. 👉🏻आपल्या गावाचे नाव भरून Done बटनावर क्लिक करावे लागेल. बटनावरआता तुम्ही भरलेली संपूर्ण माहिती दिसेल आणि खाली स्क्रोल करून सबमिट या बटनावर क्लिक करावे लागेल. बटनावरआता आपल्याला Sucess म्हणून एक मेसेज येईल. त्यावर असे समजावे की आपले मतदान ओळखपत्र आणि आधार क्रमांक लिंक झालेला आहे. 👉🏻संदर्भ : Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
16
0