AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
दुधवाढीसाठी पूर्ण मिश्रित आहार महत्वाचा!
पशुपालनAgroStar
दुधवाढीसाठी पूर्ण मिश्रित आहार महत्वाचा!
👉🏻 पूर्णमिश्रीत आहार म्हणजे ज्यामध्ये विविध खाद्य घटक ठराविक प्रमाणात एकत्र करून दिले जातात. या खाद्य घटकामध्ये मुरघास,धान्य,प्रथिने,पेंड,हिरवा किंवा सुका चारा, गव्हाचा कोंडा ,खनिज मिश्रण ,जीवनसत्व पावडर,मीठ, इस्ट,बफर ,बायपास फॅट,इत्यादी खाद्य घटकांचा समावेश होतो. 👉🏻पूर्ण मिश्रित आहार खाऊ घालण्याचे फायदे – • पूर्ण मिश्रित आहारामुळे जनावराला संतुलित पोषणतत्वाचा पुरवठा होतो. • विन्याच्या २-३ आठवडे आधी आणि २-३ आठवडे नंतर जनावराचे शरीर क्षीण होते पूर्ण मिश्रित आहारामुळे जनावरांची प्रतिकारक क्षमता वाढते व चयापचानाच्या समस्या कमी होतात. • निवडक खाद्य खाण्याच्या जनावरांच्या सवयीला आळा बसतो. • पचनक्रिया आणि आहाराची पाचकता वाढते. • उपलब्ध निकृष्ट चारा आणि इतर टाकाऊ खाद्याचा वापर करून पशुखाद्यावरील खर्च कमी करता येतो. • जनावरांना योग्य पद्धतीने पूर्ण मिश्रित आहार खाऊ घातल्यास प्रती दिन दुधाचे प्रमाण 1 ते 2.5 लिटरने वाढते. • सर्व घटक एकत्र असल्यामुळे जनावरे कमी रुचकर खाद्य घटकही खातात . 👉🏻 पूर्ण मिश्रित आहार कसा बनवावा? • जनावरांच्या पोषणतत्वांची गरज हि त्याच्या वजनानुसार रोजच्या खाद्य सेवानानुसार आणि दुधाचे प्रमाण या तीन गोष्टीवरून अवलंबून असते. • प्रथिने हिरवा चारा,सुका चारा,प्रथिने ,उर्जा आणि जीवनसत्वे या खाद्य घटकांचा विचार करून आवश्यक तितक्या प्रमाणात मोजमाप करून योग्य त्या खाद्याचा वापर करावा . • हिरव्या आणि सुक्या चाऱ्याचे 2 ते 2.5 सेंमी आकाराचे तुकडे करून घ्यावेत या चाऱ्यामध्ये धान्य ,पेंड ,खनिज मिश्रण ,जीवनसत्वे ,इस्ट पावडर मिसळावी. मुरघास मिसळून हे मिश्रण काळजीपूर्वक एकत्रित करून जनावरांना खायला द्यावे. 👉🏻संदर्भ : Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
13
0
इतर लेख