AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानPrabhudeva GR & sheti yojana
पाईप लाईन अनुदानासाठी अर्ज कसा करावा?
👉🏻सरकारच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पाइप लाइन अनुदान योजना राबविली जाते.आत्तापर्यंत राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी सदर अनुदानाचा लाभ घेतला आहे.या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतात पाइप लाइन करण्यासाठी अनुदान दिले जाते.जेणेकरून शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध व्हावी हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. 👉🏻महाराष्ट्र राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या पाईप लाइन अनुदान योजनेसाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो.त्यासाठी शेतकऱ्यांना आपले सरकार महा डीबीटी या पोर्टलवर अर्ज करावा लागणार आहे.आपण आपल्या मोबाईलवरून देखील सदर योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.तसेच जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन देखील अर्ज करता येणार आहे. 👉🏻संदर्भ : Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
30
2
इतर लेख