AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
भुईमूग पिकावरील टिक्का रोगाचे नियंत्रण!
गुरु ज्ञानAgroStar
भुईमूग पिकावरील टिक्का रोगाचे नियंत्रण!
🌱भुईमुगामधील टिक्का हा एक बुरशीजन्य रोग आहे, या रोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत असल्यामुळे भुईमूग पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते, या रोगाच्या लक्षणांमध्ये प्रथम झाडांच्या पानांवर लहान ठिपके दिसून येतात. म्हणून यास ‘टिक्का’ रोग असे म्हणतात. हे ठिपके गोलाकार असून गडद तपकिरी रंगाचे असतात. ठिपक्यांच्या कडेने पिवळ्या रंगाचे पट्टे असतात. रोगाचा प्रादुर्भाव जास्त वाढल्यास पाने पिवळी पडतात, आणि गळून पडतात. त्यामुळे भुईमुगामधील ‘टिक्का’ रोगाचे एकात्मिक नियंत्रण करणे गरजेचे आहे. याच्या नियंत्रणासाठी ॲग्रोस्टार चे पनाका एम 45 (Mancozeb 75% WP) किंवा मँडोझ (Mancozeb 63% + Carbendazim 12% WP) ची फवारणी करावी. 🌱संदर्भ : Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
8
0
इतर लेख