AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि वार्ताPrabhudeva GR & sheti yojana
सोयाबीनला हेक्टरी ₹5000 अनुदान!
👉🏻गेल्या दोन वर्षांपासून पिवळ्या सोन्याला बाजार समितीमध्ये खूपच कमी भाव मिळत आहे. यामुळे पिकासाठी आलेला खर्च देखील शेतकऱ्यांना भरून काढता येत नाहीये. या चालू हंगामात देखील तशीच परिस्थिती कायम आहे. 👉🏻यामुळे शेतकऱ्यांमध्ये शासनाविरोधात कमालीचा रोष पाहायला मिळत आहे.आता राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे. ती म्हणजे महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री यांनी एका प्रचार सभेत एक मोठी घोषणा केली आहे. 👉🏻सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना कमी बाजार भावात आपला माल विकावा लागला असल्याने त्यांना हेक्टरी पाच हजार रुपये दिले जातील अशी मोठी घोषणा केली आहे. 👉🏻विशेष बाब म्हणजे हे पैसे शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये केव्हा जमा होणार याची थेट तारीखच कृषीमंत्र्यांनी सांगितली आहे. 12 जून 2024 पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर सोयाबीनचे पैसे जमा होतील अशी मोठी घोषणा केली आहे. 👉🏻संदर्भ : Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
41
0