AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हळद शिजवण, वाळविणे व पॉलिश प्रक्रिया!
गुरु ज्ञानAgrostar
हळद शिजवण, वाळविणे व पॉलिश प्रक्रिया!
🌱हळदीची काढणी केल्यानंतर त्यावर प्रक्रिया करणे गरजेचे असते. प्रक्रियेमध्ये हळद शिजवणे, वाळवणे, पॉलीश करणे आणि प्रतवारी करणे या बाबी समाविष्ट असतात. हळद काढणीनंतर त्वरित सावलीत किंवा पाल्याखाली साठवण करावी. त्यानंतर ४ ते ५ दिवसांमध्येच हळदीवर शिजविण्याची प्रक्रिया करावी. हळद शिजवण्यापूर्वी हळकुंडांची प्रतवारी करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण, सर्व हळकुंडांचा आकार एकसारखा नसतो, जाडी कमी अधिक असते. त्यामुळे जाड हळकुंडांना शिजण्यास जास्त वेळ तर लहान हळकुंडांना कमी वेळ लागतो. त्यामुळे हळद शिजवण्यापूर्वी हळकुंडांची प्रतवारी करून घ्यावी. 🌱हळद शिजविण्याचे फायदे: बुरशी व इतर जिवाणूंचा नाश होऊन हळकुंड रोगमुक्त राहते. हळकुंडांवरील धागे व इतर दुर्गंधी येणारे घटक निघून जातात. हळदीतील शर्करा राखून ठेवली जाते. वाळण्याची प्रक्रिया जलद होते. 🌱हळद वाळविणे: हळद शिजविल्यानंतर सुरुवातीचे ४ ते ५ दिवस ३ ते ४ इंचापेक्षा मोठा थर देऊ नये. मोठा थर दिल्यास हळकुंड वाळण्यास उशीर लागतो. त्याचप्रमाणे हळकुंड काळी पडतात. हळकुंडे साधारणपणे ८ ते १० दिवस उन्हात चांगली वाळवावी, वाळलेली हळद पाण्याने भिजाणार नाही याची दक्षता घ्यावी. हळद शक्यतो ताडपत्रीवरती किंवा कठीण जागेवरती वाळवावी, त्यामुळे मजुरीवरती होणारा खर्च कमी होईल. 🌱पॉलिश व प्रतवारी करणे: वाळलेली हळद विक्रीसाठी मार्केटला पाठविण्यापूर्वी पॉलिश करणे अत्यंत आवश्यक असते. हळद पॉलिश करणे म्हणजे वाळलेल्या हळकुंडावरची खरबरीत साल काढून टाकणे. पॉलिश करण्यासाठी ऑईलच्या बॅरलला १.२ ते २ इंच अंतरावरती छन्नीने भोक पाडून हा बॅरल लोखंडी कन्यावरती फिट करून हा पॉलिश ड्रम स्टँडवर बसवून फिरविल्यास हळकुंडाची वरची साल निघून जाते व हळद पॉलिश होते. हेच काम १ एच. पी. सिंगल फेज मोटारवरती चालणार्‍या लाकडी अष्टकोणी ड्रमवरतीच करता येते. 🌱पॉलिश केल्यानंतर प्रतवारी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी मोठे हळकुंड, मध्यम, लहान कणी, त्याचप्रमाणे गड्डे, सोरा गड्डा अशी वेगवेगळ्या प्रकारामध्ये प्रतवारी करून तयार माल विक्रीसाठी मार्केटला पाठवावा. प्रतवारी न करता विक्रीस पाठविल्यास मालास योग्य भाव मिळत नाही, परिणामी आर्थिक नुकसान होते. 🌱संदर्भ : Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
22
1
इतर लेख