AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
उन्हाळी भुईमूग पेरणीचे नियोजन!
गुरु ज्ञानAgrostar
उन्हाळी भुईमूग पेरणीचे नियोजन!
🌱भुईमूग हे तीनही हंगामामध्ये घेतले जाणारे गळीत धान्य पीक आहे. पाण्याची उपलब्धता असल्यास उन्हाळी भुईमुगाची पेरणी 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी पर्यंत पूर्ण करावी. लागवडीसाठी हलकी ते मध्यम, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. ज्या जमिनीत वाळू आणि सेंद्रिय घटकांचे योग्य प्रमाणात मिश्रण आहे अशा जमिनीत भुसभुशीतपणा अधिक असतो. त्यामुळे आऱ्या जमिनीत सहजपणे घुसतात, शेंगा चांगल्या पोसल्या जातात. वाणानुसार तसेच दाण्याच्या आकारमानानुसार एकरी 30 ते 40 किलो बियाणे पेरणीसाठी वापरले जाते. 🌱संदर्भ : Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
46
0
इतर लेख