AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
जनावरांना दिवसभरात किती पाण्याची गरज असते!
पशुपालनAgroStar
जनावरांना दिवसभरात किती पाण्याची गरज असते!
▶ जनावरांच्या शरीराला लवचिकता पाण्यामुळे येते. पचनक्रियेत अन्नघटक विरघळून ते संपूर्ण शरीरात पुरवले जातात. पाण्यामुळे जनावरांच्या शरीराचे तापमान स्थिर राहण्यास मदत होते. ▶ शरीरातील टाकाऊ व विषारी घटकपदार्थ शरीराबाहेर मूत्र आणि घामाद्वारे टाकण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. ▶ जनावरांच्या शरीराला पाणी कमी पडले तर गंभीर आजार होऊ शकतात. यामध्ये प्रामुख्याने डोळे कोरडे होतात, कातडी अंगाला चिकटते, जनावरांच्या वजनात घट होते, शरीरातील विषारी घटक मूत्रद्वारे, घामाद्वारे शरीराबाहेर टाकले जाऊ शकत नाहीत, त्याचा परिणाम शरीरातील इतर अवयवांवर होतो. मूत्रपिंड व मूत्राशयावर परिणाम होतो. दूध देण्याचे प्रमाण १० ते २० टक्क्यांनी घटते. ▶ जनावरांना नेहमी स्वच्छ व मुबलक पिण्याचे पाणी द्यावे. दिवसातून कमीत कमी तीन वेळेस पाणी पाजावे. जनावर गाभण असेल तर दिवसातून ४ ते ५ वेळेस पाणी पाजावे. ▶ पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता ही पाण्याचा रंग, चव, वास, तापमान, पाण्यातील गढूळपणा, पाण्याचा सामू व त्यात मिसळलेले क्षार, जैविक तत्त्वे, जिवाणू इ. वर अवलंबून असते. ▶ गाभण जनावरांना देण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये जैविक तत्त्वे, क्षार, धातूचे कण प्रमाणापेक्षा जास्त नसावेत. ▶ जनावरांना पाण्याची आवश्यकता ही त्यांचा आहार, जात, गर्भावस्था, वातावरणातील तापमान, आरोग्य तसेच दूध उत्पादनावर अवलंबून असते. दुभत्या जनावरांना दिवसातून कमीतकमी चार वेळेस पाणी पाजले तर दूध उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ होते. ▶ उन्हाळ्यात जनावरांना ४ ते ५ वेळेस पाणी पाजावे. पाण्याचे तापमान जर जास्त असेल तर जनावरे गरजेपेक्षा कमी पाणी पितात. त्यामुळे त्याचा परिणाम थेट दूध उत्पादनावर होतो. त्यामुळे जनावरांचे पिण्याचे पाणी सावलीत साठवावे. ▶ जनावरांच्या ओल्या चाऱ्यात ६५ ते ८५ टक्के पाण्याचे प्रमाण असते. त्यामुळे जनावरांनी ओला चारा जास्त प्रमाणात खाल्ला तर ते कमी पाणी पितात. तर सुका चारा जास्त प्रमाणात खाल्ला तर जास्त पाणी पाजावे. ▶ नवीन आणलेली जनावरे पाण्यातील बदलामुळे कमी पाणी पितात. अशावेळी पाण्यात थोडा गूळ मिसळून पाणी पाजावे. ▶ जनावर आजारी असल्यावर सुद्धा कमी पाणी पिते. अशावेळी त्यांच्याकडे विशेष लक्ष द्यावे. ▶ दुभती जनावरे, गाभण जनावरे, लहान वासरे, भाकड जनावरे यांना पाणी स्वच्छ व मुबलक प्रमाणात मिळेल याकडे लक्ष द्यावे. 👉🏻संदर्भ : AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
19
0
इतर लेख