AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
ड्रोन दीदी' योजना काय आहे?
योजना व अनुदानAgrostar
ड्रोन दीदी' योजना काय आहे?
👉🏻केंद्र सरकारने अंतरिम अर्थसंकल्पात नमो ड्रोन दीदी योजनेसाठी कोटी रुपयांची तरतूद केली आहे.या योजनेअंतर्गत सरकार देशभरातल्या 15 हजार महिला बचत गटांना ड्रोन वितरित करणार आहे. त्यानंतर या महिला हे ड्रोन शेतकऱ्यांना शेती कामासाठी भाडेतत्त्वावर देऊ शकणार आहेत. ड्रोनच्या सहाय्यानं खतं, कीटकनाशकांची फवारणी करण्याचं, तसंच शेतीतल्या वेगवेगळ्या कामांसाठी ड्रोनचा वापर कसा करायचा, याचं या बचत गटातल्या महिलांना 15 दिवसांचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 👉🏻आर्थिक मदत कशी मिळणार? ड्रोन दीदी योजनेअंतर्गत, ड्रोन आणि त्यासंबंधित उपकरणांच्या खरेदीसाठी एकूण रकमेच्या 80 % किंवा जास्तीस्त जास्त 8 लाख रुपये एवढी आर्थिक मदत केंद्र सरकारकडून दिली जाणार आहे. ड्रोनचा वापर आर्थिकदृष्ट्या जिथं शक्य असेल त्या भागातल्या महिला बचत गटांची आधी निवड केली जाईल आणि मग त्यांना ड्रोन पुरवले जातील. देशभरातल्या वेगवेगळ्या राज्यांमधून एकूण 15 हजार बचत गटांना ड्रोन पुरवले जातील. 👉🏻2024 ते 2026 या कालावधीत महिलांना ड्रोन पुरवण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. त्यासाठी 1261 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.महिला बचत गटातील योग्य सदस्य ज्याचं वय 18 वर्षं किंवा त्याहून अधिक असेल, अशा सदस्याची 15 दिवसांच्या ड्रोन प्रशिक्षणासाठी निवडली जाईल.यात ड्रोन पायलटचं पाच दिवसांचं प्रशिक्षण आणि शेतीच्या कामांसाठी (खत, कीटकनाशके फवारणी इ). 10 दिवसांचं प्रशिक्षण दिलं जाणार असल्याची माहिती आहे. 👉🏻ड्रोनच्या सहाय्यानं करण्याची येणारी काही कामे - - ड्रोनच्या साहाय्याने पेरणीपूर्वी आणि पेरणीनंतर जमिनीचे 3-D नकाशे तयार करता येतात. - आता खतेही द्रव स्वरुपात उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे ड्रोनच्या साहाय्यानं खतांची फवारणी करता येते. - ड्रोनच्या साहाय्यानं पिकांवर जिथं प्रादुर्भाव आहे, तिथं कीडनाशकाची फवारणी करता येते. - ड्रोनवर बसवण्यात आलेल्या सेन्सरद्वारे पिकांचं आरोग्य आणि मातीच्या परिस्थितीचं अचूकपणे विश्लेषण करता येतं. - ड्रोनवरील कॅमेरा आणि सेन्सर यांच्या मदतीनं जमिनीवरील कोरड्या भागाचा शोध घेतला जातो. त्याच क्षेत्रामध्ये पाण्याचा पुरवठा केला जातो. यामुळे पाण्याचा अपव्यय टाळला जातो. 👉🏻संदर्भ : Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
21
0
इतर लेख