AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पीक नुकसान भरपाईसाठी ई- केवायसी आवश्यक!
समाचारAgroStar
पीक नुकसान भरपाईसाठी ई- केवायसी आवश्यक!
👉🏻शेतकऱ्यांनी तत्काळ केवायसी करणे गरजेचे आहे.कारण पीक नुकसान भरपाईसाठी ई-केवायसी केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाची रक्कम जमा होणार आहे.मॉन्सूनोत्तर पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानामुळे शेतकऱ्यांना ६८ कोटी २९ लाखांची मदत वितरित होणार आहे. ६४ हजार ५६३ शेतकऱ्यांना ही रक्कम मिळेल. मात्र, यासाठी शेतकऱ्यांनी तत्काळ केवायसी करणे गरजेचे आहे. ई-केवायसी न केल्यास अनुदान मिळणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे. महसूल, ग्रामविकास व कृषी विभागाने संयुक्तपणे पिकांचे पंचनामे केले होते. 👉🏻ई- केवायसी कशी करावी : ई-केवायसी करण्यासाठी एक म्हणजे जर तुमचा फोन नंबर आधार कार्डाशी लिंक असेल तर तुम्ही Aadhar based OTP authentication वापरून ई-केवायसी करू शकता. त्यासाठी फार्मर कॉर्नरमधील ई-केवायसी या पर्यायावर क्लिक करा. पण, जर तुम्हाला Biometric authentication करायचं असेल, तर जवळच्या सीएससी सेंटरला भेट द्यावी लागेल. 👉🏻आता यातला पहिला पर्याय म्हणजे आधार कार्ड वापरून ई-केवायसी कसं करायचं ते पाहूया. - यासाठी तुम्हाला Farmers Corner मधील ई-केवायसी या पर्यायावर क्लिक करायचं आहे. - त्यानंतर Aadhar Ekyc नावाचं एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. - इथं सुरुवातीला तुम्हाला तुमच्या आधार कार्डचा क्रमांक आणि पुढच्या रकान्यात दिसणारे आकडे आणि अक्षरं जशीच्या तशी टाकायची आहेत. - हे टाकून झालं की समोरच्या Search या पर्यायावर क्लिक करायचं आहे. - त्यानंतर एक नवीन पेज तुम्हाला दिसेल. इथं सुरुवातीला तुमचा आधार नंबर दिसेल. त्यापुढे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. इथं एक लक्षात ठेवायचं ते म्हणजे तुमचा मोबाईल नंबर हा आधार कार्डशी लिंक असणं गरजेचं आहे. - मोबाईल नंबर टाकला की पुढच्या Get OTP या पर्यायावर क्लिक करायचं आहे. - त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP म्हणजेच वन टाईम पासवर्ड पाठवला जाईल. म्हणजेच काही आकडे पाठवले जातील. ते तुम्हाला इथल्या OTP या रकान्यात टाकायचे आहेत. - मग पुढे असलेल्या Submit या रकान्यात क्लिक करायचं आहे. - त्यानंतर EKYC is Sucessfully Submitted असा मेसेज तिथं येईल. याचा अर्थ तुमची EKYC ची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. 👉🏻इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे ही सेवा सरकारनं काही दिवसांपूर्वीच सुरू केली आहे. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण करताना तुम्हाला Record not found किंवा Invalid OTP यासारखे पर्याय येतील. वारंवार प्रयत्न करुनही हे पर्याय येत असल्यास सीएससी सेंटरवर जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करून घ्या. 👉🏻संदर्भ : AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
41
1
इतर लेख