AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
बाजार समितीच्या संपानंतर भाव घटले कि वाढले?
मंडी अपडेटAgroStar
बाजार समितीच्या संपानंतर भाव घटले कि वाढले?
👉🏻मागच्या काही आठवड्यापासून राज्यातील दररोजच्या कांदा आवकेत सरासरी दहा टक्क्यांनी घट होताना दिसत आहे. उन्हाळी कांदा बाजारात यायला अजून अवकाश असल्याने आणि ग्राहकांकडून मागणीही वाढत असल्याने या संपूर्ण आठवड्यात कांद्याचे बाजार स्थिरावलेले दिसून आले. दरम्यान राज्यातील अनेक बाजारसमित्यांनी सामुहिकरित्या बंद आंदोलन केले होते. त्यानंतर बाजारसमितीत 100 ते 200 रुपयांनी घसरण दिसून आली. 👉🏻तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून लसणाचे दर सातत्याने वाढत आहेत. पंधरा ते वीस दिवसांमध्येच लसणाचे दर दुपटीने वाढले आहेत, बाजारात लसूण ४०० रुपये प्रतिकिलोने मिळत आहे. एकीकडे अनेक पिकांचे बाजारभावघसरत असताना लसूण उत्पादक शेतक-यांना चांगला भाव मिळत आहे. असेच वेगवेळ्या बाजार समित्यांमधील ताजे बाजारभाव जाणून घेण्यासाठी खालील तक्ता पहा. 👉🏻संदर्भ : Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
9
0