AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
मत्स्यपालकांना मिळणार किसान क्रेडिट कार्डवर कर्ज!
योजना व अनुदानAgroStar
मत्स्यपालकांना मिळणार किसान क्रेडिट कार्डवर कर्ज!
👉🏻देशभरातील मत्स्यपालक शेतकरी आणि मच्छिमारांना आता कर्ज मिळवण्यासाठी कोणत्याही बँकेत जाण्याची गरज नाही. त्यांना किसान क्रेडिट कार्ड (KCC) द्वारे कर्ज उपलब्ध होणार आहे. हे कर्ज मत्स्यपालक आणि मच्छिमारांना घरबसल्या मिळेल. यासाठी केंद्र सरकारने ‘जन समर्थ पोर्टल’ नावाचे पोर्टल सुरू केले आहे. 👉🏻सरकार मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील कर्ज प्रणाली डिजीटल करण्याचा प्रयत्न करत आहे आणि जन समर्थ पोर्टलद्वारे मत्स्यपालक आणि मच्छिमारांना कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या पोर्टलद्वारे मत्स्यपालन विकासालाही चालना मिळेल. 👉🏻आतापर्यंत ३ लाख नोंदणी: किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून मच्छीमार आणि मत्स्यशेती करणार्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे काम सुरू आहे. यामुळे आतापर्यंत ३ लाख मत्स्यपालक आणि मच्छिमारांनी या योजनेसाठी नोंदणी केली आहे. 👉🏻पारदर्शकता आणि घरबसल्या सुविधा: जन समर्थ पोर्टल आणि किसान क्रेडिट कार्ड यांच्या एकत्रीकरणातून मत्स्यव्यवसायात पारदर्शकता आणण्याच्या एका नव्या युगाची सुरुवात होईल. देशभरातील मच्छीमार आणि मत्स्यपालक या माध्यमातून घरी बसून कर्जासाठी सहजपणे अर्ज करू शकतात आणि घरी बसूनच ऑनलाइन खातेही हाताळू शकतात. 👉🏻२५ हजार कोटी रुपयांच्या कर्जाचे उद्दिष्ट: या योजनेमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होईल आणि जिल्हास्तरावरच किसान क्रेडिट कार्ड बनवताना येणाऱ्या अडचणी दूर केल्या जातील. या योजनेसाठी २५ हजार कोटी रुपयांच्या कर्जाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. 👉🏻संदर्भ : AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
18
0
इतर लेख